मैत्रीचं लाॅकडाऊन.


संपुर्ण जगभरात कोरोना महामारी मुळे लाॅकडाऊन लावण्यात आलेलं असताना माझ्या भारतावर सुद्धा कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे.व त्यामुळे कित्येक हातावर पोट असलेल्या गोर-गरीब स्थलांतरित व भुमिपुत्र मजुर, कामगारांवर उपासमारीची भयानक अवस्था ओढवली आहे, जे स्थलांतरित मजुर पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात औघोगिक अथवा अन्य ठिकाणी काम करण्यासाठी आले होते, आर्थिक अडचण असल्यामुळे अथवा शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे त्यांना उन्हातान्हात पायी अनवाणी लहान मुले, कुटुंब घेऊन हजारो किलोमीटर चा प्रवास भुकेने व्याकुळ होऊन करतानाचे चित्र सध्या भारतात दिसत असतानाच एक अभुतपुर्व मैत्रीचं उदाहरण आज पाहवयास मिळाले.
        कोरोना प्रादुर्भावामुळे औद्योगिक वसाहतीत काम करणारे दोन मित्र आपल्या मुळ गावी जे बिहार राज्यात वसलेले आहे त्याठीकाणी जाण्यासाठी निघतात. विशेष म्हणजे ज्या हिंदू-मुस्लीम जातींमध्ये काही धर्मांध शक्ती या कोरोना महामारी मध्ये सुद्धा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अनुक्रमे त्याचं हिंदू-मुस्लीम धर्माचे जीवलग मित्र.
      त्यांच्या प्रवास सुरू होतो बिहारसाठी एका उघडल्या ट्रकमधून ज्या ट्रक सोशल डीस्टंसिंग वगैरे कसलाही प्रकार नाही ट्रक अगदी ४०-५० लोकांनी भरलेला काही किलोमीटर अंतर कापल्या नंतर मित्रांपैकी एक विजय(नाव बदलले आहे) ला अन्न पाण्याच्या कमतरतेमुळे व उन्हाच्या चटक्याने अस्वस्थ वाटू लागते काही वेळाने अस्वस्थता आणखी वाढते उलट्या जुलाब होऊ लागतात पर्यायी अशक्तपणामुळे जीवाची घालमेल सुरु होते,परंतू बाकिच्या सहप्रवाश्यांना विजयला कोरोना प्रादुर्भाव असल्याचा संशय येउन विजयला अर्ध्या रस्त्यात अशा बिकट अवस्थेत खाली उतरवले जाते व अशा वेळेस विजयच्या मदतीला सलीम(नाव बदलले आहे) सुद्धा ट्रक मधून खाली येतो, विजयला रुग्णालयात उपचार मिळावेत यासाठी वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करतो,विजयची अस्वस्थता सलीम च्या नजरेतुन सुटलेली नसते व विजयला आपला अंत समोर दिसत असतो खुप वेळ उलटल्यानंतर एक वाहन त्यांना रुग्णालयापाशी सोडते परंतु सलीम ला हे कळून चुकलेले असते कि आपल्या मैत्रीचं कायमस्वरूपी लाॅकडाऊन झालेलं आहे.परंतु सलीमला प्रतिक्षा असते ती डाॅक्टरांच्या औपचारिक घोषणेची ज्यानंतर फुटणार असतो सलीमच्या रोखुन धरलेल्या अश्रुंचा बांध.
      पण...... प्रश्र्न उरतो चूक कोणाची, हजारो कीलोमीटर पायी,ट्रकने जाणारया मजुर कष्टकरयांची,आस्थापना,ठेकेदार, उदासीन सरकार की कोरोनाची?

Comments

Comments

Popular posts from this blog

समझोता.

मैत्रीचं लाॅकडाऊन.