समझोता.


समझोता
   गावातील एका छोट्याशा १५-२० घरं असलेल्या वस्तीत नव्याने राहायला आलेलं कुटुंब घरकाम करीत आपला दारुड्या नवरा व पाच मुलींचं उदरनिर्वाह करणारी सरीता.
सकाळी व संध्याकाळी मिळेल त्या वेळेस मिळेल ते काम करून फक्त पैसे कमविण्याचे ध्येय मनाशी ठेवुन आपल्या मोडक्या संसाराचा गाडा कसाबसा रेटत होती.
       सरीताच्या पाच मुली मधु(१६),तनु(१५),संगी(१३),रेखा(११),प्रिया(८) वर्ष घरातील दारीद्रयामुळे कोणीही दिलेलं शिळं-पाकं खाऊन दिवस काढत आईला घरकामात मदत करत,फाटक्या,जीर्ण कपडयानिशी शाळेला कधी गेल्या कधी नाही अशा हलाखीत दिवस काढत होत्या,सरीता ला वस्तीवरंच आणखी एका नव्या जागी घरकाम मिळालं होतं, सरकारी काॅन्ट्रॅक्टर अशोकराव यांच्याकडे.
         अशोकराव जेमतेम ५२ वर्ष वयाचे गृहस्थ,पत्नीचे नुकतेच ३ वर्षांपूर्वी निधन झालेले,घरात काम करण्यास कोणीही नाही,सुयश नावाचा २५ वयाचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशी गेलेला,अशोकरावांचे दिवस एकांतात  जात होते.सरीता रोज नियमित अशोकरावांकडे कामास जायला लागली, अशोकराव व सरीता यांच्या स्वत:च्या आयुष्याविषयी, कुटुंबाविषयी गप्पा रंगु लागल्या पर्यायी अशोकरावांच्या एकांताला शेवटी विराम लागला व सरीताला आपलं मनं मोकळं करण्यासाठी अशोकरावांसारखा चांगला मित्र लाभला पण नियतीचा खेळ मात्र वेगळ्याच प्रकारे रंगणार होता..............वाचा पुढील भागात 
क्रमश:

Comments

Popular posts from this blog

मैत्रीचं लाॅकडाऊन.

मैत्रीचं लाॅकडाऊन.